Chinchwad : विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी केले 471 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने 24 ते 31 मार्च या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत विरुद्ध दिशेने प्रवास करणारे आणि ट्रिपल सीट वाहन चालवल्या प्रकरणी 471 गुन्हे दाखल केले.

सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी क्षेत्रे आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो.

PCMC: …अन्यथा एकही सदनिकाधारक मालमत्ता कर भरणार नाही; सोसायटी फेडरेशनचा इशारा

रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने तसेच ट्रिपल सीट वाहने चालविल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत 24 मार्च ते 31 मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे 313 वाहन चालक तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणारे 158 वाहनचालक यांच्यावर भारतीय दंड संहिता 279 नुसार एकूण 471 गुन्हे दाखल करण्यात आले.(Chinchwad) यापुढील काळात देखील अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असेही सहायक आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.