Pune : चैत्र महिन्यात वसंत ॠतूत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यफुलांची आरास

.

. एमपीसी न्यूज – चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला.(Pune) मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे व सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली. सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले आहे.

Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी ए बोलतो आहे असे सांगत ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल

सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. (Pune) ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर 7-8 दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.

मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.