Nigdi: ‘इसिए’तर्फे शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे महिलांना प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) तर्फे महिलांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ,निगडी आणि लेवाशक्ती सखी मंच, गगनगिरी विश्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला अनंत मेहेर, इसिएचे अध्यक्ष विकास पाटील, कार्यकारी अधिकारी स्नेहल पोवार, बाबुराव फडतरे, किरण चौधरी, मूर्ती प्रशिक्षक विश्वास फडणीस, रेखा भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, विजया जंगले, संगीता कवडे, स्मिता दुसाने, अनिता सोनावणे, योगिता ब-हाटे, सुभाष चव्हाण आणि 67 महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांसाठी सुरु केलेल्या विशेष प्रशिक्षणाची माहिती व आवश्यकता इसिएचे अध्यक्ष विकास पाटील यांनी समजावून दिली. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील पाणीसाठ्यांचे प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला. हा विशेष उपक्रम फक्त महिलांसाठी घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.