Pimpri : एका श्वानाच्या निर्बिजीकरणासाठी 693 रुपये खर्च 

निर्बिजीकरण करणा-या संस्थांना एक महिने मुदतवाढ 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील एका श्वानाच्या निर्बिजीकरणासाठी 693 रुपये खर्च करत आहे. शस्त्रक्रिया करण्याकामी महापालिकेने मागविलेल्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुर्वीच्या दोन संस्थांना एक महिन्यासाठी मुदतवाढ दिली. प्रती श्वान नर/ मादी प्रमाणे 693 रुपये देण्यास, 5 जून पासून पुढील एक महिना मुदतवाढ आणि नवीन संस्थांची नेमणूक होईपर्यंत येणा-या खर्चास स्थायी समितीने आज (गुरुवारी) मंजुरी दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे भटक्या, मोकाट कुत्र्यांच्या संततीला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. पालिकेबरोबरच अनेक अशासकीय संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी योजना, उपक्रम राबविण्यात आले आहेत. भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्याकामी पालिकेने तीन अशासकीय संस्थांना ठेका दिला होता. त्या संस्थांची मुदत संपली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी चार संस्थाची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी 27 नोव्हेंबर 2018 रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु, केवळ तीन निविदा धारकांनी सहभाग घेतला. निकोप स्पर्धा झाली नसल्याने महापालिकेने पुर्वीच्याच संस्थांना तीन महिने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर चार संस्थांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याने 17 जानेवारी 2019 रोजी पहिले पाकिट उघडण्यात आले. तांत्रिक तपासणी केली असता एकच संस्था पात्र झाली. त्यामुळे ती निविदा प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याला विलंब होणार आहे.

कामकाजाची निकड लक्षात घेता  लातुर येथील मेसर्स सोसायटी फॉर दि प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल (693 रुपये), नवी मुंबई येथील मेसर्स अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशन (693 रुपये)यांना पुर्वीच्या दराने एक महिना मुदतवाढ देण्यात आली. प्रती श्वान नर/ मादी प्रमाणे 693 रुपये देण्यास 5 जून पासून पुढील एक महिना मुदतवाढ आणि नवीन संस्थांची नेमणूक होईपर्यंत येणा-या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1