Blood Donation Camp : डी. वाय. पाटील विद्यापीठ आंबी येथे रक्तदान शिबिरात 70 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल अकॅडमी यांचे पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषि महाविद्यालय, आंबी, पुणे आणि चाकण ब्लड बँक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 15) राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाअंतर्गत डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (आंबी) येथे रक्तदान शिबिराचे घेण्यात आले. या शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले.

शिबिरात 70 विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या पवित्र कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय डी. पाटील, डॉ. सायली गणकर, कुलगुरू, डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (आंबी) व चाकण ब्लड बँक सेंटर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

SSC Result 2022 : टाकवे बुद्रुक येथील बाळराजे असवले इंग्लिश स्कूलचा सलग दुसऱ्यांदा 100 टक्के निकाल

Ketaki Chitale : सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं

 

तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी प्राचार्य प्रा. भाग्योदय खोब्रागडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण गोसावी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम समन्वयक, कर्मचारी वृंद व सर्व विद्यार्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.