Vadgaon Maval : केंद्र सरकारच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मूक आंदोलन

एमपीसी न्यूज- महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वडगाव मावळ येथे मूक आंदोलन करण्यात आले.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका अध्यक्ष सुनील दाभाडे, ग्रामीण युवकचे अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी अध्यक्ष संतोष मुर्हे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे, नारायण पाळेकर, दीपक मानकर, विजय काळोखे, माजी सरपंच रमेश घोजगे, अशोक घारे, अॅड जगन्नाथ गोपाळे, जेष्ठ नेत्या रूपाली दाभाडे, शैलजा काळोखे, ज्योती जाधव, सुनीता काळोखे, नगरसेविका वैशाली दाभाडे, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, अरूण माने, विशाल वहिले, विक्रम कलवडे, अतुल राऊत, भाऊसाहेब ढोरे, संदीप आंद्रे, शीतल हगवणे, मीनाक्षी ढोरे आधी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न निर्माण झाले असून, समाजाच्या सर्वच घटकांमध्ये खूपच अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या सरकारचे हे अपयश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे व या नाकर्त्या सरकारला पायउतार करून घरचा रस्ता दाखवावा ” असे आवाहन त्यांनी केले.

वळसे पाटील म्हणाले की, भुलभुलय्या करून सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत एकही आश्वासन पूर्ण केले नाही. चुकीच्या धोरणामुळे आर्थिक स्थिती खालावली असून शेतकरी, उद्योजक, व्यापारी असे सर्वच घटक असुरक्षित आहेत. लोकशाही राहणार आहे की नाही…याचा विचार माध्यमांनी केला पाहिजे. जनतेची काळजी करतो त्या घटकांसाठी आपण काम करणे महत्त्वाचे आहे. देशाच्या सीमा असुरक्षित बनल्या आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या विविध धर्मातील लोकांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. देशात अशांतता निर्माण झाली असून संपूर्ण जीवनच असुरक्षित बनले आहे. त्यास सरकारचा नाकर्तेपणाच आणि चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. मावळ तालुक्यामध्ये पक्षाची ताकद फार मोठी आहे. सर्वांनी एकत्रित राहिल्यास परिवर्तन घडेल व वेगळेच चित्र दिसेल. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बबनराव भेगडे म्हणाले, “सत्य, अहिंसा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वे आणि विचारांना या सरकारचे काळात चिरडून टाकण्याचे काम सुरू आहे. म्हणून शासनाच्या या धोरणाविरोधात पक्षाने मूक आंदोलन केले आहे ”

जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.