Pimpri: प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्याठी महापौरांनी मागितली मुख्यमंत्र्यांची वेळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. या प्रश्नावंर सविस्तर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापौर राहुल जाधव यांनी वेळ मागितली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापौरांनी निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 22 लाखाच्या घरात गेली आहे. शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यासाठी भामा-आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे प्रकल्पाचे काम वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. तसेच पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याचे काम 2011 पासून रखडले आहे. या प्रकल्पाची स्थगिती उठवून काम चालू करण्यास परवनगी मिळण्यात यावी.

याबरोबरच शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर माफीबाबत, नदी सुधार योजना, महापालिकेच्या आकृतीबंधास मान्यता देणे. रिंगरोड, रेडझोन क्षेत्राबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणे. मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेणे. त्यास पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव देण्यात यावे, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महापौर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.