Pune News : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून 8 लाखांची चोरी 

एमपीसी न्यूज : कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन तब्बल 8 लाख रुपये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटना धनकवडी आणि सदाशिव पेठेतील एटीएम सेंटरमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर आणि सदाशिव पेठेत घडल्या आहेत. 
याप्रकरणी ऋषीराज भोसले (वय 34, रा. हडपसर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीत कॅनरा बँकेचे एटीएम सेंटर आहे. 26 ते 30 सप्टेंबर कालावधीत चोरट्यांनी मशीनचे हुड काढून इंटरनेट केबल बंद केली. त्यानंतर रिसेटचे बटन दाबून ट्रान्जेक्शन करीत तांत्रिक छेडछाड केली. त्यानंतर 5 लाख 66 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत चोरट्यांनी सदाशिव पेठेतील कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनची तांत्रिक छेडछाड करुन 2 लाख 46 हजार रुपये काढून नेले. याप्रकरणी आषुतोश उपाध्याय (वय 33, वल्लभनगर,पिंपरी) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 12 ऑक्टोबर कालावधीत दोघा चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन मशीनचे हुड काढले. त्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक छेडछाड करुन 2 लाख 46 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा शोध घेतला जात असून, संबंधित बँक प्रशासनाला सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याचे सूचित करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.