Bhosari : दुचाकी देण्यास नकार दिल्याने फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज – पेट्रोल कमी असल्याने दुचाकी देण्यास नकार देणाऱ्या मजुराला फावड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 22) सायंकाळी चारच्या सुमारास दापोडी येथे घडली.

मोईद्दीनचांद शेख (वय 27, रा. पवारवस्ती, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल सोनवणे (रा. पवारवस्ती, दापोडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे दापोडी येथील एका बांधकाम साईटवर मजुरी काम करतात. शनिवारी ते प्लास्टरचे काम करीत असताना त्या ठिकाणी त्यांच्या ओळखीचा सोनावणे आला. त्याने शेख यांना दुचाकी मागितली. शेख यांनी पेट्रोल कमी असल्याचे सांगून दुचाकी देण्यास नकार दिला. त्यावर चिडलेल्या सोनवणे याने त्यांना फावड्याने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.