India Corona Update : 81 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 49 हजार 079 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 81 लाखांच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस देशात बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत असून देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 92.97 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 44 हजार 878 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 87 लाख 28 हजार 795 एवढी झाली आहे. त्यापैकी 81 लाख 15 हजार 580 रुग्ण बरे झाले आहेत तर, सध्या 4 लाख 84 हजार 547 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 28 हजार 688 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून देशाचा कोरोना मृत्यूदर 1.47 टक्के एवढा आहे. देशात आतापर्यंत 12 कोटी 31 लाख 01 हजार 739 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 39 हजार 230 नमूणे गुरुवारी (दि.12) तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरमकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तब्बल 1600 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.