Pimpri: अल्पसंख्यांक आर्थिक मंडळाचे पुणे कार्यालय सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मौलाना अबुल कलाम आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास मंडळाचे पुणे कार्यालय सुरु करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी केली आहे. अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

मुस्लिम बांधवांना उद्योग-व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विकासासाठी मौलाना अबुल कलाम आजाद अल्पसंख्याक आर्थिक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे कार्यालय पुणे जिल्हा वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पाच लाख अल्पसंख्याक रहिवासी असून त्यांना महामंडळाच्या कर्ज प्रकरणासाठी त्यांना अर्ज कोठे करायचे जमा करण्याच्या याबाबत संभ्रमावस्था आहे.

त्यामुळे त्यांना शासनाचे योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे पाच लाख अल्पसंख्यांक बांधवांसाठी पुणे जिल्ह्यात एक कार्यालय सुरू करावे अन्यथा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे. हाजी अराफत शेख यांनी हा विषय समजावून घेत, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अथवा अन्य कोणत्या ठिकाणी हे कार्यालय सुरु करता येईल, याची चाचपणी करुन निर्णय घेण्याचे आश्‍वासन कुरेशी यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.