Pimpri News: शहरात आज 183 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 161 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 853 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 357 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 65 हजार 774 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 853 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 256 रुग्ण गृहविलगीकरणात असून 597 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 48 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 439 आहेत. आज दिवसभरात 6 हजार 518 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 59 हजार 382 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.