Bhosari : बहिणीला मारल्याचा रागातून मेव्हण्याने पाडला बहिणीच्या नव-याचा दात; दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज – नवरा-बायकोचे किरकोळ कारणांवरून भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून बायकोच्या भावाने त्याच्या मित्रासह मिळून बहिणीच्या पतीला पाईपने मारहाण केली. यामध्ये त्याचा दात पाडला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी तीनच्या सुमारास इंद्रायणीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राहुल कन्हैया लालबेक (रा. घोरपडीगाव), अमित विजयसिंग पारसा (रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक भरत परमार (वय 37, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक आणि त्यांच्या बायकोची कौटुंबिक किरकोळ कारणांवरून भांडण झाले. या भांडणाबाबत माहिती मिळाल्यानंतर पत्नीचा भाऊ राहुल याने त्याच्या अमित या मित्रासह दीपक यांना शिवीगाळ करत प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. या मारामारीत दीपक यांचा एक दात पडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.