India Corona Update : चोवीस तासांत 959 रुग्णांचा मृत्यू, 2.09 लाख रुग्णांची वाढ 

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून श देशात नव्यानं वाढ होणा-या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणा-यांची संख्या अधिक आहे. चोवीस तासांत 2 लाख 09 हजार 918 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 लाख 62 हजार 628 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 24 तासांत 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 

1.देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 15.77 टक्के एवढा झाला आहे.
2. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 18.31 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
3. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 72.89 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 13.31 लाख चाचण्या पार पडल्या.
4. देशाचा रिकव्हरी रेट 94.37 टक्के एवढा झाला आहे.

5. केरळ राज्याने मागील 374 मृतांची आकडेवारी सामाविष्ट केल्याने देशातील चोवीस तासांत झालेल्या मृत्यूची संख्या वाढली आहे.
6. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 166.03 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
7. देशात आजवर 4 लाख 95 हजार 050 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

8. 15 ते 18 वयोगटातील मुलांना दुसरा डोस आजपासून उपलब्ध झाला आहे. कोव्हॅक्सिन या एकमेव लसीचा पर्याय त्यांच्यासमोर आहे.
9. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 22 हजार 444 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
10. दिल्लीत गेल्या 24 तासांत 3,674 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.