Akurdi : डॉ. डी.वाय.पाटील फार्मसी कॉलेजमधील रोजगार मेळाव्यात 18 विद्यार्थ्यांची निवड

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने अहमदाबाद स्थित कॅडीला कंपनीच्या सहकार्याने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सामूहिक मुलाखती घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये कॅंपस मधील 8 महाविद्यालयातील 82 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कॅडीला कंपनीच्या 5 अधिकाऱ्यांनी या संपूर्ण विद्यार्थ्यांची विविध स्तरावरील मुलाखत घेतली आणि 6 महाविद्यालयातील एकूण 18 विद्यार्थ्यांची निवड केली.

महाविद्यालयाच्या परीक्षण व नियुक्ती अधिकारी शुभांगी जाधव आणि सहायक प्रशिक्षण आणि व्यवस्थापन अधिकारी सुप्रिया माने यांनी या मेळाव्याचे नियोजन जस्मिता कौर व प्राचार्य डॉ.नीरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.