Pune : न्यू पुणे पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची के.बी.डी. ज्युनियर प्रो. कबड्डी फेज-२ स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसर येथे ८ व ९ जुलैला पार पडलेल्या के. बी. डी. ज्युनिअर प्रो. कबड्डी लीग स्पर्धेत न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या कबड्डी संघाने के.बी.डी. ज्युनिअर फेज-२ स्पर्धेसाठी ३ संघाना हरवून आपले स्थान निश्चित केले आहे.

संघात असलेले खेळाडू सम्यक कांबळे, मोहित शर्मा, हर्ष माने, ओम घोडके, चिन्मय विभूते, वेणुगोपाळ रेड्डी, कृष्णा शिंदे, सिद्धार्थ खुणे, दुर्वेश पाटील, सुयश आवांडे, अभय बारपाटे, आयुष नेहरा यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खंदारे, सचिव प्रदीप खंदारे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुहास तोहगावकर यांनी सर्व खेळाडूंचे तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक आबाजी माने यांचे अभिनंदन व कौतुक केले.

या कबड्डी संघाची पुढील मॅच बालेवाडी स्टेडीयमवर सोमवार(१६ सप्टेंबर) ला होणार आहे. ही मॅच स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.