Talegaon : यशवंत बबन वाल्हेकर यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 रिजन1,2 यांचे तर्फे एस.ई.सी.नायगावचे कलाशिक्षक यशवंत बबन वाल्हेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

वालचंद संचेती सभागृह निगडी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात वाल्हेकर यांनी गेली 26 वर्ष चित्रकला आणि हस्तकला या विषयात केलेल्या भरीव कार्याचा गौरव डॉ. गजानन एकबोटे कार्याध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे, एम.जे.एफ प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, वालचंद संचेती यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याबद्दल लायन्स क्लब ऑफ कामशेतचे अध्यक्ष लायन प्रताप गुंजाळ व संस्थेचे सहा. प्रशासक अशोक जाधव व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.