Bhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी साडेसहाच्या सुमारास विश्वेश्वर चौक ते अनुकूल चौकादरम्यान कचरा डेपोजवळ मोशी घडली.

सुनील संभाजी गुरव (वय 30, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी सुनील विश्वेश्वर चौक ते अनुकूल चौकादरम्यान कचरा डेपोजवळ मोशी येथे पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.