Pune : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील दिल्लीच्या आंदोलनांचे लोण पुण्यापर्यंत!

एमपीसी न्यूज – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध सभा आयोजित करुन आंदोलन केलं.

युवक काॅंग्रेस, एनएसयुआय, युक्रांद, भारती विद्यार्थी मोर्चा या संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलन जामिया विद्यापिठातले माजी विद्यार्थीही सहभागी झाले. यावेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असे फलकही झळकवण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.