Pimpri : आगारात घुसून एसटी वाहकाला मारहाण; तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आगारात घुसून तीन अनोळखी इसमांनी एसटी वाहकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 29) सायंकाळी सातच्या सुमारास वल्लभनगर येथे घडली.

हरिधर गंगाराम जाधव (54, रा. पवनानगर, मावळ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी जाधव रविवारी रात्री वल्लभनगर आगारात आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.