Talegaon Dabhade : सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या मावळ अध्यक्षपदी ह.भ.प नंदकुमार महाराज भसे

सचिवपदी ह.भ.प नितिन महाराज काकडे

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी सांप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा समिती मावळ अध्यक्षपदी ह.भ.प नंदकुमार महाराज भसे यांची तर सचिवपदी ह.भ.प नितिन महाराज काकडे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मावळ प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी रवी निवृत्तीभाऊ शेटे यांची निवड करण्यात आली.

मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यासंदर्भात मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे, सोहळा समितीचे माजी अध्यक्ष ह.भ.प. रोहिदास महाराज धनवे व तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार व बहुसंख्य वारकरी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 16) साईबाबा मंदिर कान्हेफाटा येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.

यंदा हा सामुदायिक विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रविवार दि. 26 एप्रिल 2020 रोजी कान्हेफाटा येथे होणार आहे.

सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या सचिवपदी ह.भ.प नितिन महाराज काकडे व सामुदायिक विवाह सोहळा समिती कोषाध्यक्षपदी ह.भ.प रामदास पडवळ तर ह.भ.प अनंता म.लायगुडे यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीला बबन महाराज भानुसघरे, बाळकृष्ण महाराज कोंडे, पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, नामदेव महाराज कचरे, लक्ष्मण महाराज ठाकर, गबळुबुवा कंधारे, विलास असवले, संदीप महाराज लोहोर, दारकु लालगुडे, बाळोबा (नाना) वारींगे, दीपक महाराज वारींगे, दत्तोबा भोते महाराज (विणेकरी), दत्तात्रय महाराज हजारे, नानासाहेब घोजगे महाराज, तुकाराम जाधव महाराज, विठ्ठल महाराज पांडे, संत तुकाराम झाड, पादुका ट्रस्टचे अध्यक्ष भरत महाराज येवले, सखाराम महाराज घारे आदी महाराज मंडळी व वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

आभार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज ठाकर यांनी मानले.

विभागनिहाय कार्याध्यक्ष पुढीलप्रमाणे

आंदर मावळ कार्याध्यक्ष- ह.भ.प नाथा म. शेलार

पवन मावळ कार्याध्यक्ष- ह.भ.प. सुनील म.वरघडे

नाणे मावळ कार्याध्यक्ष- ह.भ.प दिलीप म.खेंगरे

विवाह नोंदणी अधिकारी म्हणून मावळ प्रबोधिनी संस्थेचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप यांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.