Chakan : गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – गाडी घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चाकण येथे घडला.

पती पवन वसंत मोढवे, सासरे वसंत मोढवे, सासू रुक्मिणी मोढवे, दीर जीवन मोढवे, नणंद रेखा कडुसकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २८ वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 24 एप्रिल 2018 ते 19 जून 2019 या कालावधीत घडला. आरोपिंनी संगनमत करुन फिर्यादी महिलेला उपाशी ठेवले. तसेच पतीने गाडी घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.