Talegaon Dabhade : माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रस्त्याचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर सुनील तानाजी दाभाडे यांनी लगेच कामाला सुरुवात केली असून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या फंडातून माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अत्यंत गरजेचा असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण केले. या रस्त्याचे उद्घाटन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांच्या हस्ते रविवारी (दि. 26 ) करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच गणेश दाभाडे, ग्रामपंचायत सदस्या जयश्री गोठे, वैशाली शेलार, रजनी दाभाडे, राजश्री तळपे, पूनम आल्हाट, बबन माळी, रोहिदास मराठे, अनिल दाभाडे, गणेश काकडे, शेखर दाभाडे, कामगार नेते बाळासाहेब दाभाडे, गोरख दाभाडे, बजरंग जाधव, किशोर दाभाडे, पोलीस पाटील रवींद्र दाभाडे, उपसरपंच गणेश माळी, उद्योजक दीपक दाभाडे, शिवाजी दाभाडे, दत्ता दाभाडे, शाळेचे मुख्याध्यापक जाधव व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जानेवारी निमित्त गावात प्रभात फेरी काढून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सरपंच सुनील दाभाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.