Pimpri : महापालिकेचे 984.26 कोटी तातडीने द्या; आयुक्तांची ‘येस’ बँकेच्या प्रशासकाला विनंती 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील दोन वर्षांपासून येस बँकेशी व्यवहार केला आहे. महापालिकेचा दैनंदिन जमा होणारा भरणा येस बँकेत जमा होत आहे. या महसुलाचा वापर शहर विकास, कर्मचा-यांच्या वेतनासाठी केला जातो. ठेकेदारांना मोबदला दिला जातो. तो मार्च 2020 पूर्वी देणे क्रमप्राप्त आहे. बँकेत पैसे अडकल्याने महापालिकेच्या ‘कॅशफ्लो’वरही परिणाम झाला आहे. त्यासाठी येस बँकेत अडकलेले महापालिकेचे 984.26 कोटी तातडीने अदा करावेत, अशी विनंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी येस बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांच्याकडे आज (सोमवारी) पत्राद्वारे केली आहे.

येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने  भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी (दि.5 मार्च) निर्बंध लागू केले आहेत.  प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या  निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. पिंपरी महापालिकेचे करदात्यांचे कररुपातून गोळा झालेले तब्बल 984.26 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगीतून आलेले तब्बल 984.26 येस बँकेत अडकले आहेत. आता हे पैसे लवकर मिळणे अशक्य आहे. त्याचा वेतन, विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यापार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) येस बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील दोन वर्षांपासून येस बँकेशी व्यवहार केला आहे. महापालिकेचा दैनंदिन जमा होणारा भरणा येस बँकेत जमा होत आहे. महसुलाचा वापर शहर विकास, कर्मचा-यांच्या वेतनासाठी केला जातो. ठेकेदारांना मोबदला दिला जातो. तो मार्च 2020 पूर्वी देणे क्रमप्राप्त आहे.

परंतु, महापालिकेचे येस बँकेत 984.26 कोटी अडकले आहेत. बँकेत पैसे अडकल्याने महापालिकेच्या ‘कॅशफ्लो’वरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे 984.26 कोटी तातडीने अदा करावेत. बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी शाखेतील महापालिकेच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी विनंती आयुक्त हर्डीकर यांनी येस बँकेचे प्रशासक कुमार यांच्याकडे आज (सोमवारी) पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.