New Delhi : आकर्षक डिझाइनसह Nokia 5310 लाँच

एमपीसी न्यूज : स्मार्टफोन कंपनी ‘HMD Global’ने आकर्षक डिझाइनसह ‘Nokia 5310’ हा नवीन फिचर फोन लाँच केला. ग्राहकांना या फोनमध्ये एफएम रेडिओ सारखे फिचर उपलब्ध करण्यात आले  असून, दोन स्पीकर्सही देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 3100 रुपये इतकी असेल. 

Nokia 5310 मध्ये 2.4  इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी एमटी6260 ए सीपीयू, 8 एमबी रॅम, 16  एमबी स्टोरेज देण्यात आला असून, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने हा स्टोरेज 32  जीबीपर्यंत वाढविता येणे शक्य आहे. तसेच हा फिचर फोन 30+ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्य करतो.

Nokia 5310ला व्हीव्हीजीए कॅमेरा देण्यात आला असून, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये यूएसबी पोर्ट, ड्युअल सिम आणि ब्लूटूथ 3.9 आदी फिचर्सचाही यात समावेश आहे. शिवाय या फोनमध्ये 1200 mahची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यास २२ दिवस सुरु राहते, असा कंपनीचा दावा आहे.

ब्लॅक रेड आणि व्हाईट रेड या दोन रंगात हा फोन ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. हा फोन येत्या एप्रिल महिन्यात विक्रीसाठी बाजारात दाखल होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.