Pune : करोना विषाणूंची प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील ‘एनआयआव्ही’च्या वैज्ञानिकांना यश

एमपीसी न्यूज-  करोना विषाणू (कोविड -19) याची प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही) वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात या प्रतिमा प्रसिद्ध होणार आहेत.

या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे. हा विषाणू 70-80 नॅनोमीटरचा असून त्यात 15 नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, ‘विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा 75 नॅनोमीटरचा दिसतो. त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.