Sangvi : गुन्हे शाखेकडून 35 हजारांची ताडी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून 35 हजार रुपये किमतीची 700 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस सांगवी परिसरात गस्त घालत असताना पिंपळे निलख येथील वाकवस्ती येथे नदीच्या बाजूला सार्वजनिक मोकळ्या जागेत एकाने ताडी या दारूचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून 35 हजार रुपये किमतीची 700 लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी एकनाथ भंडारी (वय 29, रा. पिंपळे निलख, पुणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (फ) आणि भारतीय दंड विधान कलम 188 नुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या एका कारवाईमध्ये युनिट चारने संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून बाहेर फिरणाऱ्या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. विनायक दामोदर चौधरी (रा. गंगानगर, जुनी सांगवी), बाळू येदु जठार (रा. नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.