pimpri: फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; 11 जणांवर गुन्हा
एमपीसी न्यूज – फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या 11 जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिन्मय पाटील, सुन्नी कांबळे, अजय ननावरे, राजगुरू कदम, सुमित रणदिवे, बाटग्याचा बाप, शक्यमुनी बुध्द, प्रविण बोरकर, विहान कदम, शांताराम मांडवकर, मक्या शेठ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार दादाराम शामराव जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. संचारबंदीच्या कालावधीत प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट करून आदेशाचा भंग केल्यामुळे 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे अधिक तपास करत आहेत.