Pimpri : कामासाठी घरातून बाहेर पडताय? मग, ह्या गोष्टींची घ्या काळजी

एमपीसी न्यूज – सरकारने तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत वाढवली आहे. दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना व इतर दुकानांना थोड्या प्रमाणात सूट दिली आहे तसेच कंटेनमेंट वगळता दारूची दुकाने सुद्धा खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत.

कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व झोनमध्ये सशर्त उद्योग, दुकान व इतर गोष्टींना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने रविवारी (दि.3) दुपारी सुधारित आदेश काढून याबाबत घोषणा केली आहे.

दरम्यान, आज शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांनी दारूच्या दुकानापासून इतर दुकानापुढे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे आशा बेफिकीर वागण्याने कोरोनाचा खरच प्रतिबंध होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांनी येथून पुढे फार सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच बाहेर पडताना आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या मार्गांचा अवलंब करणे आवश्यक राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक जण ‘सायलेंट कॅरियर’ असू शकतो असे गृहीत धरुनच हालचाल करावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केला असला तरी धोका कायम आहे हे नागरिकांनी विसरता कामा नये.

जर तुम्ही घरातून बाहेर पडत असेल तर खालील गोष्टींची काटेकोर पालन करणे गरजेचे राहणार आहे.

# बाहेर पडताना मास्क जरूर वापरा.

# गर्दीची ठिकाणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी उपस्थित असाल तर इतरांपासून सहा फुटाचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंनचे पालन करा.

# बाहेरून आल्यानंतर हात व्यवस्थित सॅनिटायझ करा किंवा साबण व हँडवॉश ने स्वच्छ धुऊन काढा.

# लांबचा प्रवास टाळा शक्यतो घराजवळ असणाऱ्या किराणा दुकाना मधूनच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करा.

# सर्दी खोकला ताप श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तात्काळ सरकारी दवाखान्यात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्या.

# बाहेर फिरत असताना समोरचा व्यक्ती कोरोनाचा सायलेंट कॅरियर असू शकतो हे लक्षात ठेवा आणि सुरक्षित आंतर ठेवून व्यवहार करा.

# घरातून शक्यतो एकच व्यक्ती बाहेर पडा बाजार खरेदीसाठी विशिष्ट पिशवी निश्चित करून ठेवा घरात आल्यानंतर सर्व वस्तू सॅनिटायझ करा.

# आपला मोबाईल हादेखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो तेव्हा वेळोवेळी मोबाईल सुद्धा सॅनिटायझ करायला विसरू नका आणि शक्यतो त्याचा एकरी वापरच करा.

सरकारने संचारबंदीचे नियम जरी शितील केले असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. आता सर्व काही ठीक झाले आहे, असा गैरसमज करून बेफिकीरपणे बाहेर फिराल तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, त्यामुळे जमेल तेवढे घरातच रहा आणि सुरक्षित रहा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.