Forbes List 2020: अक्षयकुमार झाला बॉलिवूडमधला श्रीमंत सेलिब्रिटी

Forbes highest-paid celebrities: Akshay Kumar only Indian on the list

एमपीसी न्यूज- वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट करुन लोकांना विचार करायला लावणारा अभिनेता म्हणजे आपल्या सगळ्यांचा अक्की म्हणजेच अक्षय कुमार. यावेळी अक्षय मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अक्षयने नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

नुकतीच ‘फोर्ब्स’ने जगभरातील १०० श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यात अक्षयकुमार ५२व्या स्थानावर आहे. तसेच त्याची वर्षाची कमाई ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३६६ कोटी रुपये आहे.

या यादीमध्ये स्थान पटकावणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०१९मध्ये देखील अक्षयने या यादीमध्ये स्थान मिळवले होते. पण तेव्हा त्याची कमाई ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) होती.

यंदा अक्षयच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे. या यादीमध्ये अक्षयकुमार या एकमेव बॉलिवूड अभिनेत्याचे नाव आहे. ‘

या यादीमध्ये मॉडेल कायली जेनर पहिल्या स्थानावर आहे. तिची कमाई ५९० मिलियन डॉलर (जवळपास ४४५ कोटी रुपये) इतकी आहे. त्यानंतर कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

या यादीमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासचा देखील समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.