Motor Document Validity : वाहन कागदपत्रांच्या वैधतेत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ – नितीन गडकरी

Vehicle documents validation extended till September 30 - Nitin Gadkari

एमपीसी न्यूज – वाहन कागदपत्रांची वैधता सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सविस्तर सूचना दिली आहे.

नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करताना म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक कठीण परिस्थितीतून जात आहेत.

त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाहन कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

याबाबत सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी ही कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत वैध धरण्याची सूचना करण्यात आली आहे.

गडकरी पुढे म्हणाले, मार्च महिन्यात दिलेल्या निर्देशानुसार फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा अन्य कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी रोजी संपली असेल किंवा जूनपर्यंत कालबाह्य होईल, अशी मुदत 30 तारखेपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.