Maharashtra’s First Female Fighter Pilot: नागपूरच्या अंतरा मेहता महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट

Nagpur's Antara Mehta is the first female fighter pilot in Maharashtra शनिवारी अंतरा यांनी हैदराबाद येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग नोंदवला.

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच नागपूरमधून एक खूशखबर समोर आली आहे. अखेर महाराष्ट्राला पहिली महिला फायटर पायलट मिळाली आहे. आता हवाई युद्धात शत्रूला नामोहरम करण्यासाठी नागपूरच्या अंतरा मेहता सज्ज झाल्या आहेत. नागपूर येथील अंतरा मेहता या महाराष्ट्रातील पहिल्या तर देशातील दहाव्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

अंतरा यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजेच सीडीएसच्या परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर त्यांनी इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीत प्रवेश घेतला. शनिवारी अंतरा यांनी हैदराबाद येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग नोंदवला.

नागपूरच्या रिजनल पब्लिक रिलेशन ऑफिसरकडून याबाबत टि्वट करुन माहिती देण्यात आली आहे. अंतरा मेहता आता फ्लाएंग ऑफिसर झाल्या आहेत. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. आतापर्यंत देशात अशा 10 महिला फायटर पायलट आहेत.

अंतरा या रवी आणि पूनम मेहता यांच्या कन्या आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवडल्या गेलेल्या अंतरा या त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला अधिकारी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.