Pimpri: ‘त्या’ कोविड रुग्णांच्या बिलाची आकारणी शासकीय दराने करावी – राहुल कलाटे

The bill for those coward patients should be paid at the government rate - Rahul Kalate

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्याच्या विविध योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत. मात्र, ज्यांच्याकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका आहे. अशा कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलाची आकारणी महापालिकेने सीजीएचएच (शासकीय) दराने करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

याबाबत कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत.

मात्र, ज्यांच्याकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका आहे. अशा कोरोनाबाधित रुग्णांना पुणे महापालिका शासकीय दराने बिलाची आकारणी करणार आहे. त्याची पिंपरी महापालिकेने देखील अंमलबजावणी करावी.

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखांपर्यंतचे वैद्यकीय शुल्क देण्यात येते. यासोबतच जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजनांचाही लाभ दिला जात आहे.

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात जे रुग्ण या योजनांचे लाभार्थी होऊ शकणार नाहीत. त्यांच्या देखील बिलांची रक्कम शासकीय दराने घेण्यास खासगी रुग्णालयांना सूचित करावे. शक्य असल्यास ठराविक रक्कम महापालिकेने अदा करावी.

महाराष्ट्र शासनामार्फत महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र ठरणा-या लाभार्थ्यांना निकषांप्रमाणे लाभ देण्यात येत आहेत.

महापालिका परिसरातही याच धोरणानुसार नियोजन करावे. देखरेखीसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करावा. जेणेकरुन शहरातील नागरिकांना त्याची मदत होईल, असेही कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.