Pune : हृदयरोग व इतर रुग्णांना रुग्णालयात जागा नाही – रमेश बागवे

Heart patients and other patients have no place in the hospital - ramesh bagwe या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी

एमपीसी न्यूज – हृदयरोग व इतर रुग्णांना रुग्णालयात जागा नाही, असे सांगून माघारी पाठवीत आहेत. असे रुग्ण अनेक हॉस्पिटलच्या दारात फिरून मृत झालेले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहाराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

पुणे शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमितीतर्फे निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या या संकट काळात अनेक रुग्णालयांना किती रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, किती रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याची माहिती असतानाही हृदयरोग आणि इतर रुग्णांना मात्र रुग्णालयात जागा नाही, असे सांगून माघारी पाठवीत आहेत.

याबाबत आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रमेश बागवे यांनी केली आहे. पुणे शहर काँग्रेसला या कारवाईची माहिती द्यावी. त्यामुळे शहर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन आपापल्या भागातील रुग्णालयाची रोजच्या रोज स्थिती कळविली जाईल.

महापालिकेवरील भार कमी होऊन रुग्णांना देखील लवकरात लवकर माहिती मिळून त्यांच्यावर वेळेवर उपचार होतील, करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही निवेदनात म्हटले आहे. उपजिल्हाधिकारी जयश्री कटारिया यांनाही असेच निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.