Pimpri: रुग्ण वाढीचा वेग कायम; आज 689 नवीन रुग्णांची नोंद, 580 जणांना डिस्चार्ज, 15 जणांचा मृत्यू

Patient growth rate maintained; Today 689 new patients were recorded, 580 discharged, 15 died : शहरातील रुग्णसंख्या दहा हजार पार झाली

एमपसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 656 आणि शहराबाहेरील 33 अशा 689 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 580 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या दहा हजार पार झाली आहे. सध्या ही रुग्णसंख्या 10446 वर पोहोचली आहे.

शहरात आज 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आकुर्डीतील 65 वर्षीय वृद्ध महिला, पिंपरीतील 72 वर्षीय वृद्ध, 60 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 79 वर्षीय वृद्ध, 49 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 55 वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर पिंपरीतील 37 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय वृद्ध, भोसरीतील 53, 42, 38 वर्षीय तीन पुरुष, निगडीतील 65 वर्षीय पुरुष, खेड येथील 70 वर्षीय वृद्ध, आणि खडकीतील 12 वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 10446 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 6480 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 175 जणांचा, तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 51 अशा 226 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 2993 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1387

# पॉझिटीव्ह रुग्ण – 689

#निगेटीव्ह रुग्ण – 443

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1684

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1684

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1388

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 10446

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2993

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 226

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 6480

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26797

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 89058

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.