Pune : ‘भाजयुमो’तर्फे शरद पवार यांना ‘जय श्रीराम’ मजकुराची पत्रे रवाना

Bhartiy Janata Yuva Morcha Send Leeter jai shriram to Sharad Pawar : शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्यावर केलेल्या वक्त्याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करुन निषेध करण्यात आला.

एमपीसी न्यूज – भारतीय जनता युवा मोर्चा पुणे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘जय श्रीराम’ असा मजकूर असलेली पत्रे पाठवण्यात आली. पुण्यातील सिटी पोस्ट, समाधान चौक, लक्ष्मी रोड येथून ही पत्रे पाठवून शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्यावर केलेल्या वक्त्याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करुन निषेध करण्यात आला.

यावेळी ‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘पवार साहेब जय श्री राम’, अशा घोषणा देण्यात आल्या. ‘भाजयुमो’चे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

नगरसेवक राजेश येनपुरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे दीपक पोटे यांनी सांगितले.

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून पवार यांच्या निवासस्थानी ‘जय श्री राम’ असे लिहिलेली असंख्य पत्रे पाठविण्यात येणार आहेत.

प्रभू श्रीराम यांची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन केल्याचे यावेळी पोटे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी न्यायालयाच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर बांधण्याचा प्रश्न सोडविला.

त्याबद्दल मोदी आणि शहा यांचे उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.