Pimpri News: शहरात आज 52 मृत रुग्णांची नोंद; 987 नवीन रुग्ण तर 903 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 984 आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 987 नवीन रुग्णांची आज (शनिवारी)  भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 69 हजार 423 वर पोहोचली आहे.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 903 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 25 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 27 अशा 52 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. शहरात 25 मृतांमध्ये काल व आज 10 आणि दोन दिवसांपूर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेल्या 15 जणांचा समावेश आहे.

पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, पिंपळेगुरव, चिखली, भोसरी, किवळे, च-होली, दिघी, फुगेवाडी, निगडी, रावेत, मोशी, बोपखेल, हडपसर, वारजे माळवाडी, वानवडी, लोहगाव, चाकण, बावधन, कर्वेनगर  येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 69 हजार 423 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 54  हजार 432 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1134 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 362 अशा 1496 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 5444 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.