Pune Crime : माजी दिवंगत नगरसेवकाच्या मुलावर खूनी हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
एमपीसी न्यूज – युवा सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे सुपूत्र दीपक विजय मारटकर यांच्यावर पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने खूनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले. आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोळे, डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटारसायकल वरून पसार झाले.
सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. मोटारसायकलवर नंबर प्लेट नव्हती. पोलीस परिसरातील सीसी टीव्ही फूटेज तपासत आहेत. मारटकर यांना उपचारासाठी केईएममध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.