Chinchwad News : यशस्वी होण्यासाठी बदलते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे – डॉ. दीपक शहा

एमपीसीन्यूज : शैक्षणिक क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे. नवनवीन संकल्पना साकार करताना शिक्षणाबरोबर पूरक क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे.  जिद्द, चिकाटी, सखोल अभ्यासाच्या जोरावर आजच्या स्पर्धेच्या युगात प्राविण्य मिळविता आले पाहिजे. त्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे प्रतिपादन कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची 89 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया उपस्थित होते.

तनय सुतार या विद्यार्थ्याने डॉ. अब्दूल कलाम यांची तत्त्वे पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने सादर केली. तर विद्यार्थीनी परवीन निखत यांनी त्यांच्या विविध पुस्तकांचा सारांश सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याबद्ददल दोघांचे विशेष कौतुक करण्यात आले.

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून पेन्सिल व पेनच्या साहाय्याने सुबक चित्राकृती कशी काढावी यासाठी मंडला आर्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पुणे येथील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सच्या प्रा. पुजा लालवानी यांनी विविध प्रकारच्या चित्राकृती काढून सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या समन्वयीका प्रा. तुलिका चटर्जी, सदस्या प्रा. अपर्णा जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सूत्रसंचालन डॉ. सुरेखा जोगदंड यांनी तर, आभार विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री ननावरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.