Bhosari Crime : ‘बँकेतून कर्ज काढून आण, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एका बँकेतून कर्ज काढून आण, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

भुवनेश्वर त्र्यंबक जानापुरे (वय 40), राजकुमार त्र्यंबक जानापुरे (वय 32, दोघे रा. भोसरी), त्र्यंबक रचप्पा जानापुरे (वय 65), शारदाबाई त्र्यंबक जानापुरे (वय 60, दोघे रा. लातूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भुवनेश्वर याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत फिर्यादी महिलेने आरोपीला विचारले. त्यावरून आरोपीने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर ‘बंधन बँक भोसरी येथून तुझ्या नावावर कर्ज काढून पैसे घेऊन ये. नाहीतर तुला संध्याकाळी जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देत महिलेचा आर्थिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.