Talegaon Dabhade : कलापिनीची बाल नाट्य स्पर्धा बाल आणि मोठ्या कलाकारांनी गाजविली 

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेच्या वतीने कै.डॉ. शं.वा.परांजपे स्मृती बाल नाट्य स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या हे या स्पर्धेचे ४३ वे वर्ष होते. कोविड मुळे शाळा बंद असल्याने कलापिनी कलाकार मीनल कुलकर्णी यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेतून घरातील, सोसायटीतील, परिवारातील मोठ्या कलाकारांनी बालकलाकारांना घेऊन बाल कथांचे नाट्य रुपांतर सादर केले व स्पर्धेला वेगळीच रंगत आणली.  

कलापिनीच्या नवीन कै.डॉ.शं.वा.पराजपे नाट्य संकुलाच्या मिनी थिएटर मध्ये संपन्न झालेल्या या रंगतदार स्पर्धेत पिंपरी चिंचवड ,पुणे व मावळ मधील १२ संघ सहभागी झाले होते.स्पर्धेचे परीक्षण मा.रमेश वाकनीस,ज्योती गोखले व राजेंद्र पाटणकर यांनी केले. पारितोषिक वितरण तळेगावचे जेष्ठ वैद्यकीय व्यवसायिक कलाकार आणि स्नेहवर्धक मंडळाचे संस्थापक डॉ.सु.मो.ढाकेफाळकर यांचे हस्ते झाले.

या प्रसंगी तळेगावातील जेष्ठ शिक्षिका,लेखिका व दिग्दर्शिका असलेल्या श्रीमती जयश्री जोशी यांचा अमृत महोत्सवानिमित्त गौरव करण्यात आला.आपल्या मनोगतात श्रीमती जयश्री जोशी यांनी कलेचा आनंद देणाऱ्या व व्यक्तिमत्व संपन्न करणाऱ्या या स्पर्धेत विविध भूमिकांमधून सहभागी होता आले या बद्दल आनंद व्यक्त केला .परीक्षकांनी सर्व लहान मोठ्या कलाकारांचे अभिनंदन केले व स्पर्धेनिमित्त कलेचा,नाटकाचा आनंद घ्या असे स्पर्धकांना आवर्जून सांगितले. या प्रसंगी रंगमंचावर तिन्ही परीक्षक,डॉ,सु.मो. ढाकेफाळकर,जयश्री जोशी यांच्या सह श्रीपाद बुरसे,सौ.अनघा बुरसे उपस्थित होते.

डॉ. सु.मो. ढाकेफाळकर यांनी कै.डॉ.शं.वा.परांजपे यांच्या आठवणींना उजाळा दिला व स्पर्धा रूपाने व वास्तुरूपाने त्यांचे कार्य जतन केल्याबद्दल कलापिनीला धन्यवाद दिले. या प्रसंगी श्री राजेंद्र देशपांडे यांनी काढलेल्या कै.डॉ.शं.वा.परांजपे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

स्पर्धा संयोजक अशोक बकरे यांनी पारितोषिक वितरणाचे सूत्र संचालन केले मुख्य संयोजक चेतन पंडित यांनी आभार प्रदर्शन केले

डॉ.सावनी परगी हिने गायलेल्या श्लोकाने समारंभाची सांगता झाली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चेतन पंडित,शार्दूल गद्रे, सायली रौन्धळ,आदित्य धामणकर,जितेंद्र पटेल,रश्मी पांढरे,रामचंद्र रानडे,दीप्ती आठवले, मीरा कोन्नुर,हरीश पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले ध्वनी व्यवस्था सुमेर नंदेश्वर यांची होती.

 

कै. डॉ.शं.वा.परांजपे स्मृती स्पर्धा २०२१ अंतिम निकाल :-

सांघिक पारितोषिके:-

प्रथम : ,स्वछंद,पुणे. नाटिका…रवालाडू

द्वितीय : कलासाम्राज्य पुणे, नाटिका… म्याव म्याव निरंजन.

तृतीय : शिवमंगल स्वरनाट्यधारा, नाटिका : मन पाखरू पाखरू.

उत्तेजनार्थ: आम्ही कल्लाकार, पुणे, नाटिका… आटपाट गावचा गुणा.  उत्तेजनार्थ : कलापिनी कुमारभवन.तळेगाव दाभाडे , नाटिका…वेड्याचे राज्य.लक्षवेधी : शोभा नगर संघ तळेगाव दाभाडे. : कोल्ही बाई आणि ससा.

दिग्दर्शन प्रथम : नितीन वाघ , कलासाम्राज्य पुणे

दिग्दर्शन द्वितीय : अमृता स्मीतल, स्वछंद पुणे.

दिग्दर्शन तृतीय : अंजली क-हाडकर, शिवमंगल स्वरनाट्यधारा पुणे.

लेखन प्रथम :. अमृता स्मीतल, स्वछंद पुणे. ले. द्वि.अंजली. क-हाडकर, शिवमंगल स्वरनाट्यधारा, पुणे.

लेखन तृतीय:. सत्यम कोठावदे, आम्ही कल्लाकार पुणे.

रंगभूषा/वेशभूषा  : प्राईम रोज  स्कूल, बेबडओहळ,मावळ, पुणे.नाटिका जादूची घंटा.

रंगमंच रचना : शोभा नगर संघ, तळेगाव दाभाडे. कोल्हिणबाई आणि ससा.   संगीत : आम्ही कल्लाकार पुणे नाटिका आटपाट गावचा गुणा.

अभिनय (मुले) :

प्रथम : सोहम पवार, भूमिका : राजा, नाटिका : वेड्याचे राज्य, कलापिनी कुमाभवन, तळेगाव दाभाडे.

द्वितीय : यश विजापुरे, भूमिका..प्रधानजी, आटपाट गावचा गुणा, आम्ही कल्लाकार पुणे.

तृतीय : अर्णव कुलकर्णी, भूमिका..  वाणी.नाटिका :रवालाडू.स्वछंद पुणे.

उत्तेजनार्थ : चित्रांशु तापस. भूमिका : गुरु,वेड्याचे राज्य, कलापिनी कुमाभवन तळेगाव दाभाडे. उत्तेजनार्थ : देवांना चिंबाळकर, भूमिका : सर्वेश, नाटिका : सहल, तालतरंग म्युझिकल अकॅडमी, तळेगाव दाभाडे. उत्तेजनार्थ : मीतांश शहा भूमिका …वाघ, शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ!,लिटील स्टार्स, तळेगाव दाभाडे.

अभिनय (मुली)

प्रथम : अवनी परांजपे…जुई….मन पाखरू पाखरू, शिवमंगल स्वरनाट्यधारा, पुणे.

द्वितीय: प्रज्ञा जोशी..छोटे पिल्लू…रवा लाडू.. स्वछंद पुणे.

तृतीय: शाल्मली घोलप… गोगलगाय… प्रवास गोगलगायीचा… ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे.

उत्तेजनार्थ : सावनी दात्ये … मोठं पिल्लू, रवा लाडू. स्वछंद पुणे. उत्तेजनार्थ : संप्रिती हुंडारे….राधाआजी..कोल्हिणबाई

आणि ससा., शोभा नगर संघ तळेगाव दाभाडे. उत्तेजनार्थ लावण्या शेलार..‌स्नेहा…..‌‌सहल ..तालतरंग तळेगाव दाभाडे.

प्रौढ कलाकार : अमृता जोगदेव…  ACP बबलगम….रवा लाडू, स्वछंद पुणे,

विनया परांजपे…आई…मन पाखरू पाखरू, शिवमंगल स्वरनाट्यधारा पुणे,

नरेश पाटील…बाबा… म्याव म्याव निरंजन, कलासाम्राज्य पुणे.

अक्षय धोत्रे आणि निखिल जाधव.. पंटर १ व २ .. म्याव म्याव निरंजन, कलासाम्राज्य पुणे.

अभिषेक अलुरकर….गुणा… आटपाट गावचा गुणा… आम्ही कल्लाकार पुणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.