Pimpri News: माध्यमिक शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणार, दोन कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 14 लाख रुपये खर्च होणार आहे.

महापालिकेच्या शहरात 123 शाळा आहेत. त्यामध्ये 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळांमध्ये 87 मराठी माध्यमाच्या, उर्दू तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येकी दोन शाळा आहेत. तसेच माध्यमिक विद्यालयांमध्ये 17 मराठी आणि एक उर्दू माध्यमाची शाळा आहे. उर्वरित शाळांमध्येही आता सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

त्यासाठी इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 2 कोटी 22 लाख रुपये निश्चित करण्यात आला. त्यामध्ये दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 3.51 टक्के म्हणजेच 2 कोटी 14 लाख रुपये लघुत्तम दर सादर केला. आयुक्त यांनी या कामांची निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.