Pimpri corona Update : नव्या रुग्णांची संख्या घटली ! आज 1169 रुग्णांची नोंद, 1965 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1 हजार 134 आणि महापालिका हद्दीबाहेरील 35 अशा 1 हजार 169 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, 64 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 965 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 39 आणि महापालिका हद्दीबाहेरील 25 अशा 64 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 47 पुरुष आणि 17 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 31 हजार 357 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2 लाख 6 हजार 988 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3378 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1727 अशा 5 हजार 105 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 7 हजार 118 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2568 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 31 हजार 690 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.