Maval Corona Update : मावळात आज 123 नवीन रुग्ण; 124 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात बुधवारी (दि.30) 123 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 498 इतकी आहे. रुग्ण संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 745 आहे.

शहरी भागात 57 तर ग्रामीण भागात 66 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 23 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 18 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 24,031 झाली आहे. तर दिवसभरात 124 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

आज, बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात टाकवे बुद्रुक, इंदोरी व मंगरूळ येथे प्रत्येकी 06, कुसगाव बुद्रुक, कामशेत व वरसोली येथे प्रत्येकी 05, बऊर 04, कार्ला व थुगांव प्रत्येकी 03, डोंगरगाव, सोमाटणे, पिंपळोली, आंबळे, नवलाख उंब्रे व काले येथे प्रत्येकी 02, नायगाव, परंदवडी, कुरवंडे, उर्से, आपटी, कोंडीवडे (आ मा), औंढोली, देवघर, सुदवडी, वराळे व चांदखेड येथे प्रत्येकी 01 असे एकूण 66 रूग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 22,787 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,665 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,030 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,229 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 12,914 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,117रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.82 टक्के आहे तर मृत्यू दर 2.07 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 212 लोणावळा नगरपरिषदमध्ये 85, वडगाव नगरपंचायतमध्ये 36 व ग्रामीण भागात 412 असे एकूण 745 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.