Pune News: खंडणी मागितल्याची तक्रार देणाऱ्या व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला
एमपीसी न्यूज: खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसात दिल्याच्या रागातून एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पुण्याच्या लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या घटनेत सलीम करमानी शेवानी (रा. येरवडा) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचं महात्मा गांधी रस्त्यावर चप्पल चे दुकान आहे. काही दिवसापर्वी येरवड्यातील टर्फ क्लब परिसरात आरोपी सलाउद्दीन शेख आणि त्यांच्या काही साथीदारांनी फिर्यादीला अडवले आणि त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
सोमवारी दुपारी शेवानी दुकानातून कामानिमित्त घरी निघाले होते. व्हिक्टरी चित्रपटगृहाजवळ दोघांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर देखील त्यांच्यावर हल्ला झाल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.