Chinchwad Crime News : सहा चोरीच्या घटनांमध्ये शिसे, दुचाकी, मोबाईलसह पावणे दोन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी, भोसरी, हिंजवडी, चाकण आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा चोरीच्या घटना घडल्या. या सहा घटनांमध्ये एक लाख 70 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मरकळ ते तळोजा नवी मुंबई या प्रवासादरम्यान ट्रकमधून 60 हजारांचे शिसे चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी गणेश बाबासाहेब देशमुख (वय 40, रा. चिखली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसरी आणि चाकणमधून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. वैभव श्रीनिवास माळवदे (वय 30, रा. भोसरी) यांची 25 हजारांची तर विनोद ज्ञानेश्वर पाटील (वय 28, रा. चाकण) यांची 10 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. माळवदे यांनी भोसरी तर पाटील यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात अज्ञात चोरट्यांनी 60 हजारांचे शो चे भांडे चोरून नेले. याप्रकरणी अनिता गोखले बेंजिनर (वय 70, रा. डेक्कन जिमखाना, पुणे) यांनी फिर्याद दिली. तर दुस-या घटनेत 15 हजारांचा मोबाईल चोरटयांनी चोरून नेला. याप्रकरणी अमित अभिषेक (वय 41, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली.

खराळवाडी पिंपरी मधून पाच जणांनी मिळून दोन रेन ट्री ही झाडे कापून चोरून नेली. याप्रकरणी संदीप पांडुरंग गायकवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.