MPC News Quiz 7 : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषा – भगवती ज्वेलर्सच्या वतीने बक्षिसांचा डबल धमाका! जिंका तब्बल चांदीचे 18 करंडे
एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या (MPC News Quiz 7) ‘देवीचा जागर’ या ऑनलाईन प्रश्नमंजुषेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बक्षिसांची संख्या दुपटीने वाढविण्याचा निर्णय स्पर्धेचे प्रायोजक तळेगाव दाभाडे येथील ‘भगवती ज्वेलर्स’च्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. आता स्पर्धेत नऊ ऐवजी 18 चांदीचे करंडे बक्षीस म्हणून देण्यात येतील.
https://forms.gle/PR1nWr9q2hVn6jux6
या स्पर्धेत सर्व वयोगटातील, मुले-मुली, स्त्री-पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतात. केवळ पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातून कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. एकाच कुटुंबातील एक किंवा अनेक सदस्य देखील सहभागी होऊ शकतात.
Today’s Horoscope 02 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य
प्रत्येक दिवसाच्या प्रश्नांची सर्व उत्तरे अचूकपणे देणारे स्पर्धकच पारितोषिकासाठी पात्र ठरतील. पात्र स्पर्धकांच्या नावांमधून सोडत पद्धतीने दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात येईल. या सर्व निवड प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन नवरात्रौत्सवात दररोज देवीचा जागर करावा, असे आवाहन भगवती ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी पत्रकार प्रभाकर तुमकर यांनी प्रश्न संकलन केले असून भीम मागाडे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे.