Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात (Talegaon Dabhade) आला. ध्वजवंदन, विद्यार्थ्यांचे संचलन, नृत्य, गीत, भाषणे आदीं मधून देशप्रेमाची मशाल उपस्थितांच्या मनामनात प्रज्वलित करण्यात आली. यावेळी पारितोषिक वितरण आणि खाऊ वाटप देखील करण्यात आले.

गुरुवार दि.26 जानेवारी2023. तळेगाव दाभाडे. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित,कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या घटनेचा उजाळा देऊन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, जयंत वैद्य सिनियर आर्किटेक्ट, साक्षी रोहिदास म्हाळसकर (राष्ट्रीय खेळाडू वेटलिफ्टिंग ), संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे,संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे, संस्थेच्या सचिव राजश्री म्हस्के,दीपक जाधव,तळेगाव लायन्स क्लबचे सभासद सुनील वाळुंज व   प्रमिला वाळुंज तसेच इतर मान्यवर ध्वजारोहणासाठी उपस्थित होते.

Walchandnagar News : दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवलदाराला अटक

आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थी संचलन झाले. विद्यार्थ्यांच्या मनोऱ्यातील डोलाऱ्याने सर्व उपस्थितितांची मने जिंकली. तसेच या कार्यक्रमात नृत्य,गीत,भाषणे या सर्व कार्यक्रमाने कार्यक्रमाला बहार आली.

अध्यक्षीय भाषणात पाहुण्यांनी मिळालेले स्वातंत्र्य व आजचा भारत यातील फरक व जीवनातील खेळाचे महत्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मागील आठवड्यात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे वाटण्यात आली. पारितोषिक वितरणानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. नववीचे विद्यार्थी  वरदायिनी डाळिंबकर व  लालू चव्हाण (Talegaon Dabhade) यांनी केले. तसेच संचलन व पिरॅमिडचे सूत्रसंचालन प्रमिला धोंगडे , पारितोषिक वितरणाचे व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचे सूत्रसंचालन अनुक्रमे पद्मजा सातव,श्रावणी देसाई व  ज्योती नवले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.