Koregaon Park : तू सुंदर दिसतेस म्हणत पतीच्या भावाकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज : सख्या दिरानेच महिलेचा विनयभंग (Koregaon Park) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साखरपुडा समारंभ कार्यक्रमासाठी घातलेला ड्रेस बदलण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. 33 वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर तिच्या पतीच्या सख्या भावा विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये 30 मार्च 2022 रोजी हा प्रकार घडला.

Kiwale : महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीच्या पतीचा सख्खा भाऊ आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये साखरपुडा समारंभ कार्यक्रमासाठी (Koregaon Park) घातलेला ड्रेस चेंज करण्यासाठी फिर्यादी गेल्या होत्या. यावेळी आरोपीने अश्लील हावभाव करत फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.