Pimpri News : ‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ आणि ‘आरोग्यमित्र फाउंडेशन आयोजित’ जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कम्युनिटी रेडिओ (Pimpri News) ‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ आणि ‘आरोग्यमित्र फाउंडेशन आयोजित’ जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम शनिवारी 11 मार्च रोजी खूप उत्साहात पार पडला. पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक विकासामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा अनुभवी शिक्षिका, साहित्यिका आणि ज्येष्ठ कलाकार श्रीमती माधुरी ओक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

 

भक्ती आणि शक्ती या दोन्हींचा अनुभव करून देणाऱ्या दोन दर्जेदार कलाकृतींचं सादरीकरण या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळालं. पिंपरी चिंचवड परिसरातून अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी कलाकारांची रसिकप्रेक्षक म्हणून विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

 

 

साईनाथ बालक मंदिर, चिंचवड या शाळेच्या शिक्षक कलाकारांनी ‘वसा वारीचा’ हे प्रभावी नाट्यवाचन सादर करून रसिकांना पंढरपूरच्या वारीचं दर्शन घडवून आणलं. वैभवी तेंडुलकर लिखित आणि दिग्दर्शित या नाट्य वाचनामध्ये स्वाती कुलकर्णी, रेवती नाईक, मानसी कुंभार यांचा सहभाग होता. सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना डॉक्टर मीनल कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित, भारतीय स्वातंत्र्य युद्धातील वीरांगनांची यशोगाथा सांगणा-या ‘अपराजिता’ या नृत्यनाट्याने उपस्थित सर्व रसिकांच्या मनामध्ये देशप्रेमाची आणि स्त्री शक्तीची कधीही न विझणारी ठिणगी पेटवली‌.

 

 

PCMC : महापालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प  सादर 

 

 

‘महिला दिन हा केवळ महिलांसाठी मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकामध्ये असलेलं स्त्रीत्व जपण्यासाठी साजरा केला जावा’ हा नवा विचार इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएमच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले- कुलकर्णी यांनी मांडला. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ हा पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीसाठी कायमच सक्रिय असेल ही ग्वाही सुद्धा या निमित्ताने त्यांनी दिली.

 

यासाठी परिसरातील वेगवेगळ्या विषयातील तज्ञांनी, साहित्यिकांनी, कलाकारांनी इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ला अवश्य संपर्क करावा आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती करावी असा आवाहनही या निमित्ताने माधुरी ढमाले – कुलकर्णी यांनी केलं‌. (संपर्क क्रमांक – 9371332683). आरोग्यमित्र फाउंडेशनचे सदस्य राजीव भावसार यांचं या कार्यक्रमाला विशेष सहाय्य लाभलं.

 

 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक गिरीश (Pimpri News)देसाई, पीसीसीओई आर चे प्रिन्सिपल डॉक्टर हरीश तिवारी, डिजिटल मार्केटिंग हेड केतन देसले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.